योगायोग मॅरेज ब्युरो तर्फे हार्दिक स्वागत....
संपुर्ण महाराष्ट्रात अस्सल मराठमोळ्या सुशिक्षित उमेदवारांना आपुलकीने सेवा देणारी अग्रगण्य संस्था म्हणजे "योगायोग" ! फक्त Website व्दारा स्थळं दाखवून लग्न जुळत नाहीत असे योगायोगचे ठाम मत आहे. मध्यस्थाची भुमिका, उत्तम मार्गदर्शन, पत्रिकेविषेयक शंका-कुशंका या योगायोगच्या जमेच्या बाजू आहेत.
बदलत्या काळाची गरज ओळखून स्त्री-पुरुषांच्या भुमिकांबाबत लवचिकता दाखवणं ही आजच्या गृहस्थाश्रमाची नितांत गरज आहे. सध्याच्या संगणकीय काळात शिक्षणाचा, आर्थिक प्राप्तिचा विचार करुनच स्थळं सुचवावी लागतात. या सर्व गोष्टींचा सुक्ष्म विचार करुनच संत्रानगरी नागपूरच्या सौ. गौरी पंकज बेलन यांनी 2005 मध्ये उच्चशिक्षित ब्राम्हण उमेदवाराचे अविस्मरणीय get-to-gether घेउनच योगायोगच्या कार्याला सुरुवात केली. विज्ञान शाखेच्या शिक्षणाबरोबर ज्योतिषशास्त्रात पदवी घेतलेल्या सौ. गौरी बेलन प्रत्येक विवाहेच्छुक उमेदवाराला उत्तम समुपदेशन (Counseling) करुन जोडीदार निवडून देण्यासाठी आनंदाने सहकार्य करतात.
नागपूर शहराच्या व्यतिरीक्त अन्य शहरांमधील उमदेवारांपर्यंत पोहचण्यासाठी श्री. पंकज बेलन सदैव तत्पर असतात. योगायोगच्या सदस्यांना अनुरूप स्थळं सुचविण्यासाठी त्यांच्या विविध प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी सौ. गौरी बेलन ह्यांची मैत्रीण सौ. रुपाली अभय सावजी ह्या सुद्धा योगायोगचा एक मजबुत आधार आहेत. कमी वेळात हजारो लग्न जुळवण्याचे यश संपादन करण्याचे रहस्य म्हणजे योगायोग तर्फे दिली जाणारी वैयक्तिक सेवा (Personal Touch).
नोंदणी तुमची सेवा आमची या शिर्षकाला अनुसरुनच योगायोग सर्व शाखेची ब्राम्हण, मराठा, कुणबी, तेली, क्षत्रीय, राजपूत व इतर अन्य समाजातील सदस्यांना आत्मियतेने सेवा पुरवित आहेत. पुनर्विवाहेच्छुकांचे शेकडो लग्न योगायोगच्याच मध्यस्थीमुळे सहज जुळुन येतात. दरवर्षी योगायोग व्दारे उच्चशिक्षित उमेदवारांचे अनोखे गेट-टू-गेदर आयोजित केले जाते. या कार्यक्रमासाठी खास बाहेरगावचे उमेदवार स्वतः आवर्जून उपस्थित असतात. आणि आधुनिक स्वयंवर पद्धतीने जोडीदार निवडतात. मागील पाच वर्षापासून योगायोग व्दारे प्रकाषित होणारे उच्चशिक्षित स्थळांचा व विवाहविषयक उपयक्त लेखांसहितचे विशेषांक सुद्धा सदस्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
"योगायोगव्दारे जुळलेले लग्न यशस्वी होणारच असा विश्वास योगायोगने संपादन केलेला आहे." महाराष्ट्रातील व इतर राज्यातील मराठमोळे सदस्य योगायोगच्या सेवेला धन्यवाद व भरभरुन शुभाशिर्वाद द्यायला विसरत नाही. शिव-शक्तीचा संयोग आणण्याचे दिव्यव्रत योगायोग सदैव साकारत राहणार.
विवाह म्हणजे दोन कुटुंबाचं अतूट बंधन आहे.
सुखी संसाराचं एक सुंदर स्वप्न.
खर तर प्रत्येकाची जीवन गाठ ईश्वरच
बांधतो परंतू निमित्य मात्र आम्हाला करतो.
"योगायोग" द्वारा लग्न जमवणे हा जरी
आमचा व्यवसाय असला तरी
वैवाहीक सुखी जीवन ईश्वरच सर्वांना देऊ शकतो.
तेव्हा प्रत्येक दांम्प्त्यावर सुख,
वैभव आणि समृद्धिचा वर्षाव व्हावा
एवढीच आमची नम्र प्रार्थना !